
बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. या वयातही ती तितकीच सुंदर दिसते. तिच्या करिअरमध्ये तिने अनेक हिट चित्रपट दिले. प्रत्येक हिरोसोबत तिची जोडी हिट ठरली. मात्र करिअरच्या काळात माधुरीचं नाव अनेक कलाकारांसोबत जोडलं गेलं. आज माधुरीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असाच एक किस्सा जाणून घेऊया जेव्हा तिचं नाव एका सुपरस्टारसोबत जोडलं गेलेले. आणि त्याची त्याची पत्नी थेट चित्रपटाच्या सेटवर येऊन पोहोचली.