
Bollywood News: बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली माधुरी दीक्षित गेले काही दिवस तिच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्या निमित्ताने माधुरीची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या मुलाखतीत ती तिच्या करिअरमधील अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतेय. अभिनेत्रीशी असलेल्या मतभेदापासून ते रिजेक्शन पर्यंत सगळंच ती सांगताना दिसतेय. याच मुलाखतीत माधुरीने तिच्या ' हम साथ साथ है' मधील अनुभवाबद्दल सांगितलं आहे.