
महाकुंभ मेळ्यात आपल्या मोहक डोळ्यांनी आणि मोत्यांच्या माळा विक्रीमुळे चर्चेत आलेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांनी गाझियाबाद येथून त्यांना ताब्यात घेतले.