
तत्कालिन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या काळात नेमण्यात आलेल्या अनुदान कमिटीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने मराठी चित्रपटांचे स्क्रीनिंग केले. त्यामुळे चांगले मराठी चित्रपट अनुदानास अपात्र ठरले आणि मराठी चित्रपट निर्मात्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. याबाबत राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाने आवाज उठवताच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ चित्रपटांचे स्क्रीनिंग थांबविले होते. मात्र आता त्याच कमिटीमार्फत पुन्हा मराठी चित्रपटांचे स्क्रीनिंग सुरू झाल्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.