
मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मराठी ओटीटी प्लॅटफाॅर्मची घोषणा केली होती. मराठी चित्रपटांना हक्काचा ओटीटी प्लॅटफाॅर्म मिळणार म्हणून सर्वत्र स्वागत करण्यात आले; मात्र त्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा मराठी चित्रपटसृष्टीकडून केली जात आहे. तत्कालीन सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेल्या घोषणेची विद्यमान सांस्कृतिकमंत्री आशीष शेलार अंमलबजावणी करणार की त्यांची घोषणा हवेतच विरणार, असे आता बोलले जात आहे.