

MAHARASHTRACHI HASYAJATRA
ESAKAL
छोट्या पडदा हा मनोरंजनाचा खजाना आहे. यावर अनेक मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यात जे दाखवलं जातं त्यावर प्रेक्षकांचा लगेच विश्वास बसतो. त्यामुळे आपण काय दाखवतो हे लेखक आणि दिग्दर्शकाला समजणं खूप महत्वाचं असतं. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्येही अनेक स्किट दाखवण्यात येतात. त्यात अनेक गोष्टी हसण्यावारी नेल्या जातात. अशीच एक चूक हास्यजत्रेच्या स्किटमध्ये झाली होती. त्यावर सचिन गोस्वामी यांनी दिलेली प्रतिक्रियाही तितकीच महत्वाची ठरली.