

nimish kulkarni
esakal
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे अभिनेता निमिष कुलकर्णी घराघरांत पोहोचला. आपल्या सहजसुंदर अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या मराठी नाटकानंतर हिंदी चित्रपट 'अग्नि'मध्ये तो झळकला. सध्या 'सनई चौघडे' मालिकेतील त्याच्या गाजणाऱ्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो 'द्विधा' या आगामी मराठी चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण करणार आहे. येत्या २१ ऑगस्टला 'द्विधा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.