
ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना चित्रपट सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला ते ओशोंच्या आश्रमात गेले आणि तिथेच राहू लागले. काही वर्षे तिथे राहिल्यानंतर ते बॉलिवूडमध्ये परतले. पण तुम्हाला माहिती आहे का विनोद खन्ना यांची ओळख आध्यात्मिक गुरू ओशोंशी कोणी करून दिली? ते महेश भट्ट होते. महेश भट्टदेखील अशोंसोबत राहिले होते. मात्र काही दिवसातच त्यांना त्यातला फोलपणा लक्षात आला.