

mahes kokate aka anaji pant
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात लोकप्रिय ठरतात. या मालिका गाजल्या की त्यातील प्रत्येक पात्रही घराघरात पोहोचतं आणि लोकप्रिय ठरतं. मालिकेच्या मुख्य कलाकारांना तर प्रेम मिळतंच सोबतच मालिकेत सहाय्यक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही लोक ओळखू लागतात. मात्र नायकाला किंवा नायिकेला जितकं प्रेम मिळतं तितकं प्रेम मालिकेच्या खलनायकाला मिळत नाही. उलट त्यांच्या भूमिकांमुळे लोक त्यांना शिव्या घालतात. हीच त्यांच्या कामाची पोच पावती मानली जाते. आता छोट्या पडद्यावरील अशाच एका खलनायकाने त्याचा अनुभव सांगितला आहे.