

mahesh kothare on laxmikant berde
esakal
आपल्या अभिनयाने संपूर्ण मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांच्या विनोदाने त्यांना घराघरात पोहोचवलं. १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांचं निधन झालं मात्र त्यांची लोकप्रियता आजही तितकीच आहे. आज जर ते असते तर त्यांनी कित्येक नटांना पाणी पाजलं असतं. अभिनय हा त्यांच्यात जन्मापासूनच होता. मात्र या हरहुन्नरी अभिनेत्याने फार लवकर प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यांची आणि अभिनेते महेश कोठारे यांची मैत्री तर जगजाहीर आहे. महेश यांच्या प्रत्येक चित्रपटात ते होते. त्यांच्याशिवाय महेश यांचा चित्रपटच पूर्ण होत नसे. त्यामुळेच आला जिवलग मित्र गेला हा महेश यांच्यासाठीही खूप मोठा धक्का होता. आता महेश यांनी त्यांच्या निधनानंतरचा प्रसंग सांगितला आहे.