
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे 'माहेरची साडी'. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अशी जादू केली ज्यामुळे हा चित्रपट अजरामर ठरला. आजही या चित्रपटाच्या आठवणी अनेक प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केलं होतं. मात्र त्यापूर्वी महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन करावं असं ठरलेलं. परंतु, एका गोष्टीमुळे महेश यांनी यासाठी नकार दिला. काय होती ती गोष्ट?