
महेश कोठारे हे नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड मोठा आहे. अभिनेत्यासोबतच ते एक उत्तम दिग्दर्शक, निर्माता आणि डान्सरदेखील आहेत. त्यांना सिनेमातील दूरदृष्टी होती. याच दूरदृष्टीच्या जोरावर ते मराठी सिनेमात निरनिराळे प्रयोग करत आहेत. मग तो मराठी चित्रपटात बोलक्या बाहुल्यांचा खेळ दाखवणं असेल किंवा मारुती रायामुळे लक्ष्मीकांत यांना आलेली प्रचंड शक्ती असेल. मराठीच नाही तर हिंदीमध्येही त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती केली. मात्र त्यांच्या हातून एक मोठी चूक घडली जी सुधारण्यासाठी त्यांना अनेक वर्ष मेहनत करावी लागली.