

mahesh manjrekar
esakal
सध्या मराठी सिनेसृष्टीत एका सिनेमाची जोरदार चर्चा आहे. यातील कलाकारांचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. हा चित्रपट म्हणजे 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आता बळीराजावर होणारा अन्याय या चित्रपटात दाखवण्यात आलाय. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः महाराजांना खाली यावं लागलं आणि भ्रष्ट राजकारण्यांना धडा शिकवावा लागला. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके महाराजांची भूमिका साकारताना दिसतोय. आता मांजरेकरांनी चित्रपटात सिद्धार्थला घेण्याचं कारण सांगितलंय.