
२००९ साली प्रदर्शित झालेल्या 'मी शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाने मराठी माणसाची मेलेली अस्मिता जागवली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांना मराठी अस्मितेशी पुन्हा ओळख करून दिली होती. मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा जागृत केला होता. आता पुन्हा एकदा तशीच सणसणीत चपराक मराठी माणसाला बसणार आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीये. ' 'पुन्हा शिवाजीराजे भोसले... याचसाठी केला होता अट्टहास!' असं या आगामी सिनेमाचं नाव आहे.