
मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची आणि दिग्दर्शनाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांनी सिनेसृष्टीत स्वतःची जागा निर्माण केलीये. त्यांनी मराठीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यात एका मोठ्या गंभीर आजाराचा सामना केलाय. 'बिग बॉस मराठी ३' च्या प्रोमोसाठी ते चक्क अनेक ट्यूब्स लावून सेटवर हजर झाले होते. याबद्दल त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.