
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने तब्बल ६०० कोटींहून अधिकची कमाई केली. यात विकी महाराष्ट्राचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करतोय. या चित्रपटात छत्रपतींच्या छाव्याची म्हणजेच संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आलीये. धर्मासाठी प्राण देणारा आपला राजा या चित्रपटातून प्रेक्षकांना कळला. त्यांच्यापर्यंत पोहोचला. यासाठी लक्ष्मण उतेकर यांचंही कौतुक झालं. मात्र आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.