

mahesh tilekar
esakal
लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर अनेकदा समाजातील चुकीच्या गोष्टींवर बोलताना दिसतात. आवाज उठवताना दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश टिळेकर यांनी स्वामी समर्थांच्या नावाखाली चाललेल्या भक्तीच्या बाजाराबद्दल राग व्यक्त केलाय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात एक व्यक्ती स्वामींच्या वेशात येऊन बारसं करून जातात. त्याबद्दल टिळेकर यांनी कानउघडणी केलीये.