

MAKARAND ANASPURE FAMILY
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी आपल्या विनोदाच्या जोरावर भल्याभल्यांना गार केलंय. त्यांची प्रत्येक भूमिका गाजली आहे. अशातच आता त्यांच्या 'साडे माडे तीन' या चित्रपटाचा सिक्वेल आलाय. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच आता मकरंद यांनी पहिल्यांदाच त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत एका कार्यक्रमात हजेरी लावली. यात त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलांचा चेहरा दाखवला आहे.