
आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याचीच चाहत्यांमध्ये जास्त चर्चा असते. मात्र ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या डान्ससाठी जास्त लोकप्रिय आहे. तिला डान्सची प्रचंड आवड आहे. ती कुठेही कोणत्याही गाण्यावर नाचू शकते. बॉलिवूडच्या डान्सिंग क्वीनचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती चक्क खिळ्यावर नाचताना दिसतेय. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चकीत झालेत.