

malaika arora restorant
esakal
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. व्यावसायिक आयुष्यासोबतच ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नुकतंच मलायकाच्या रेस्टॉरंट एक वर्ष पूर्ण झालं. हे रेस्टॉरंट कायमच खवय्यांमुळे चर्चेत असतं. कारण तिथे मिळणाऱ्या वेगवेगळ्या डिशेश आणि त्यांच्या किमती. मलाइका अरोरा हिने आपला मुलगा अरहान खान याच्यासोबत मिळून मुंबईतील वांद्रे येथील पाली व्हिलेजमध्ये 'स्कार्लेट हाऊस' नावाचे एक आलिशान रेस्टॉरंट सुरू केलं होतं. ९० वर्षे जुन्या एका ऐतिहासिक इंडो-पोर्तुगीज बंगल्यात वसलेले हे रेस्टॉरंट सुमारे २५०० वर्ग फूट क्षेत्रात पसरलेले असून, यात कॉफी बार, वाइन रूम आणि डायनिंग एरिया असे विविध विभाग आहेत. या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या पदार्थांच्या किमती तुम्हाला ठाऊक आहेत का?