चित्रपटगृहात होणार अंकुश, कुशल, अभिजीत आणि संतोष गँगचा तुफान राडा; 'मामाच्या गोव्याला जाऊया' चा धमाकेदार टीझर आऊट

MAMACHYA GOVYALA JAUYA TEASER RELEASE: मनोरंजनाच्या चार हुकुमी एक्क्यांची मोठ्या पडद्यावर भन्नाट गँगमस्ती! 'मामाच्या गोव्याला जाऊया' च्या टीझरचे भव्य सोहळ्यात अनावरण
MAMACHYA GOVYALA JAUYA

MAMACHYA GOVYALA JAUYA

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. मैत्रीची एक वेगळीच क्रेझ दाखवणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागली असतानाच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बालगंधर्व परिवार ट्रस्ट व पुणे महानगरपालिका आयोजित अलविरा मोशन एंटरटेनमेंट प्रस्तुत 'बालगंधर्व रंगमंदिर ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या टीझरचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी सिनेरसिकांना चित्रपटातील लाडक्या कलाकारांना थेट भेटण्याची सुवर्णसंधी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com