MAMACHYA GOVYALA JAUYA
esakal
BEST MARATHI COMEDY MOVIE SET IN GOA: सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे आणि सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्रकारचे मित्र-मैत्रिणी भेटत असतात. परंतु खरी मैत्री एकमेकांवरील विश्वासातून...समजूतदारपणातून...एकमेकांवरील निःस्वार्थ प्रेमातून होत असते. कारण अनेक नात्यांमध्ये मैत्रीचे नाते अमूल्य असते. आपल्या सुख-दुःखामध्ये साथ देणारा तसेच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा मित्रच असतो. मित्रांमुळे आपला आत्मविश्वास वाढतो..आपला आनंद द्विगुणीत होतो. अशाच जीवलग आणि धमाल मित्रांची कहाणी सांगणारा चित्रपट म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया.