
Marathi Entertainment News : ममता कुलकर्णी तब्बल २५ वर्षांनी भारतात परतल्यानंतर सतत चर्चेत आहे. ती यापूर्वी केनियात राहत होती आणि तिच्या अचानक पुनरागमनानंतर ती बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपला असा कोणताही हेतू नसल्याचे तिने स्पष्ट केले. ममताने सांगितले की, ती बॉलिवूडसाठी नव्हे, तर कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात परतले आहे, असे तिने सांगितले.