
Prayagraj, Uttar Pradesh: तिरंगा, क्रांतिवीर, करण-अर्जुन आणि नसीब यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम करणारी बॉलीवूड अभिनेत्री पुन्हा चर्चेत आलेली आहे. ममता कुलकर्णी यांनी कुंभमेळ्यात आपलं पिंडदान केलं आहे. त्यामुळे त्या आता महामंडलेश्वर बनल्या आहेत. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर महामंडलेश्वर ही उपाधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र ममता कुलकर्णी यांचं पूर्वायुष्य कायम वादग्रस्त आणि चर्चेत राहिलेलं आहे.