
ajinkya raut
esakal
काही प्रतिभावान कलावंतांनी आपल्या कठोर मेहनतीच्या बळावर इतिहासातील महान व्यक्तिरेखांना रुपेरी पडद्यावर अजरामर केले आहे. याच परंपरेचे अनुकरण करत आता अभिनेता अजिंक्य राऊत प्रथमच मोठ्या पडद्यावर एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात अजिंक्य तरुण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.