
अल्ट्रा झकास मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि वेगळं आणण्याचा प्रयत्न करत असतं. विशेषतः पोलिस तपासणी, गुन्हेगारी आणि भ्रष्ट व्यवस्था यावर आधारित कथा सादर करण्याच्या बाबतीत अल्ट्रा झकास एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म ठरत आहे. ‘राख’ ही त्याच दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे. ‘राख’! ही वेब सिरीज केवळ गुन्हेगारी आणि पोलिस तपासावर आधारित नसून, सत्याच्या शोधात एका पोलिस अधिकाऱ्याच्या प्रवासाची आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर पडणाऱ्या परिणामांची एक उत्कंठावर्धक कथा आहे. तसेच ही वेब सिरीज २१ मार्चला अल्ट्रा झकासवर येणार असून, आज १७ मार्चला सोशल मीडियावर ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.