

mansi naik
esakal
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. मानसी नुकतीच ४० वर्षांची झाली. तिने हटके पद्धतीने व्हिडिओ शेअर करत तिचा वाढदिवस साजरा केला. 'चार दिवस सासूचे', 'शाब्बास सुनबाई' अशा मालिकांमध्ये दिसलेली मानसीने आता चाळीशीत प्रवेश केलाय. त्यानिमित्ताने तिने सेलिब्रेशन केलंय. आपलं वय न लपवता तिने वाढदिवस साजरा केलाय. वाढदिवसासाठी ती आपल्या मैत्रिणीसोबत खास ठिकाणी पोहोचली होती.