
मराठी सोबतच हिंदी अभिनयक्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मानसी साळवी. मानसीने अनेक चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या गाजलेल्या भूमिकांपैकी एक भूमिका म्हणजे शुभ्राची. झी मराठी वाहिनीवरील 'असंभव' मालिकेत मानसीने शुभ्राची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. हटके विषय, उत्कृष्ट कलाकार यामुळे ही मालिका काही दिवसातच घराघरात पोहोचली होती. मात्र १०० दिवसातच तिने ही मालिका सोडली होती. आता तिने त्यामागचं कारण सांगितलं आहे.