

MANSI SALVI
ESAKAL
असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्येही आपली ओळख निर्माण केली. अशी अनेक नावं सांगता येतील ज्यांनी मराठीनंतर हिंदीकडे आपला मोर्चा वळवला आणि तिथेच आपलं स्थान निर्माण केलं. हिंदीमध्ये त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. मात्र कधीकधी काम करताना एकमेकांसोबतची मतं न पटल्याने किंवा काही अडचणींमुळे वाद निर्माण होतात. त्यामुळे कलाकार मालिकेतून निघून जाताना दिसतात. मराठीमध्येही असे मालिका अर्ध्यात सोडून गेलेले अनेक कलाकार आहेत. असाच अनुभव आता एका मराठी अभिनेत्रीला देखील आलाय. ही अभिनेत्री आहे मानसी साळवी.