'mangala' new marathi movie
'mangala' new marathi movie sakal

Mangala Marathi Movie: 'मंगला'द्वारे उलगडणार एका गायिकेचा थक्क करणारा प्रवास...

The plot of the film is about the journey of a singer: मंगलावर झालेला ॲसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
Published on

New Movie: सध्या सर्वत्र महिलांवर आधारित अनेक कथानक असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येताना पहायला मिळत आहेत. या चित्रपटांना महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. महिलाकेंद्रित चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक हा एका गायिकेचा प्रवास मांडणारा आहे. ‘मंगला’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकतंच या नव्या चित्रपटाचं मोशन पोस्टर समोर आलं आहे.

‘मंगला’ या गायिकेच्या खऱ्या आयुष्यातील खडतर प्रवास या चित्रकथेतून मोठ्या पडद्यावर येणार आहे. मंगलावर झालेला ॲसिड अटॅक आणि त्या कठीण परिस्थितीशी तिने दिलेली झुंज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ॲसिड अटॅकसंबंधित कोणताही कायदा त्या काळी नसल्याने योग्य तो न्याय न मिळाल्याने या लढ्याचा सामना मंगलाने कसा केला, अशी खरीखुरी कथा पाहणं रंजक ठरणार आहे.

'mangala' new marathi movie
kiara Advani: 'तिचा मी आदर करतो आणि तिच्या कामावर मी खूप प्रभावित आहे', विकीने केली कियाराची स्तुती!

‘मंगला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा हॉशिंग यांनी केले आहे. निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. संगीत शंतनु घटक याचे आहे. मोशन पोस्टरवर पाठमोरी बसलेली महिला नेमकी कोण आहे, ही भूमिका नेमकी कोणती अभिनेत्री साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com