Manisha Koirala : "मी कायमच चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडले" ; अखेर रिलेशनशिप बाबत मनीषा कोईरालाने दिली कबुली

Manisha Koirala confession about past relationship : अभिनेत्री मनीषा कोईरालाने तिच्या पूर्वीच्या रिलेशनशिपबाबत कबुली दिली.
Manisha Koirala Relationship
Manisha Koirala RelationshipEsakal

Manish Koirala Interview : 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गाजलेल्या वेबसिरीजमुळे अभिनेत्री मनीषा कोईराला चर्चेत आली आहे. एकेकाळी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या मनीषाच्या दमदार कमबॅकमुळे सगळेचजण तिचं कौतुक करत आहेत. नुकतंच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिने कायम चुकीच्या पुरुषांना डेट केल्याची कबुली दिली.

मनीषा म्हणाली...

मनीषाने नुकतीच फिल्मफेअरला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या जुन्या रिलेशनशिप बाबत खुलासा केला. ती म्हणाली,"मी फक्त चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात का पडले याचा विचार मी केला. कारण मला आश्चर्य वाटायचं की मी हे सारखं सारखं का करतेय? सर्वात त्रासदायक व्यक्तीकडे मी आकर्षित होतेय तर माझीच काहीतरी चूक आहे का? हे समजून घेत मला कशामुळे त्रास होत आहे यावर काम करणं आवश्यक असल्याचं मी ठरवलं. मी आता पाच ते सहा वर्षांपासून सिंगल आहे आणि मी रिलेशनशिपमध्ये येण्याच्या मूडमध्ये नाही कारण मला अजूनही असं वाटतं की मला स्वतःवर खूप काम करण्याची गरज आहे."

"मी इकडे या इंडस्ट्रीत बाहेरची होते, मी नेपाळहून आले होते आणि इथे कोणालाच ओळखत नव्हते. मी नुकतीच शाळा सोडली होती आणि मला काय बरोबर काय चूक याची जाणीव नव्हती. मला वाटलं की, मला वाटत असलेला एकटेपणा प्रियकर किंवा माझा जोडीदार भरून काढेल, पण तसं कधीच झालं नाही. त्यानंतर मला एकटे न राहण्याचा एक क्रिएटिव्ह मार्ग सापडला. काही लोक (ज्यांना मनीषाने डेट केलंय) नात्यांबद्दल रोमँटिकपणे बोलायचे, मला कँडललाइट डिनरवर घेऊन जाण्याबद्दल बोलायचे आणि मला आश्चर्य वाटायचं की हे कधी झालं. प्रत्येक वेळी ‘रेड फ्लॅग’ असायचा, पण मग मी दरवेळी माफ करून पुढे जायचे. वेळ आणि वाढत्या वयाबरोबर मला जाणवलं की मी माझ्या आजूबाजूला खूप अनावश्यक लोक जमवले आहेत." असंही ती पुढे म्हणाली.

Manisha Koirala Relationship
Manisha Rani Reaction : 'झलक दिखला जा' ची विजेती झाल्यानंतर समोर आली मनिषाची पहिली प्रतिक्रिया!

मनिषाने आतापर्यंत विवेक मुशरान, डीजे हुसेन, सेसिल अँथनी, प्रशांत चौधरी यांना डेट केलं आहे. पण सगळ्यात जास्त तिचं रिलेशनशिप गाजलं ते नाना पाटेकर यांच्याबरोबर. नाना आणि मनीषा बराच काळ लिव्ह इनमध्येही राहत होते पण नंतर काही कारणांमुळे त्यांचं रिलेशनशिप तुटलं. तर मनिषाने सम्राट दहलबरोबर लग्न केलं होत पण त्यांचा घटस्फोट झाला.

Manisha Koirala Relationship
Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com