

kalpesh same
esakal
मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. आता मराठी अभिनेता कल्पेश समेळ यानेही लग्नगाठ बांधत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. त्याने त्याने दिग्दर्शिका प्रतीक्षा खासनीस हिच्याशी लग्नगाठ बांधलीये. मात्र त्यांनी कोणताही बडेजाव न करता कोणतेही विधी न करता सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलीये. त्यांनी २४ जानेवारी २०२६ रोजी लग्न केलं. लग्नात प्रतिक्षाने राणी कलरची साडी नेसली होती तर कल्पेशने पांढरा कुर्ता व त्यावर राणी कलरचं उपरणं घेतलं होतं.