

jitendra joshi wife
esakal
मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपलं स्थान निर्माण करणारा लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशी प्रेक्षकांचा लाडका आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या कवितादेखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मात्र अशातच याच्या पत्नीने केलेली पोस्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरलीये. सोशल मीडियावर अनेक विषयावर वाढ होत असतानाच जितेंद्र जोशींची पत्नी मिताली जोशी हिने खास पोस्ट शेअर केलीये. यात तिने मुलीला इंग्रजी माध्यमामध्ये घातल्याबद्दल माफी मागितलीये. सोबतच खंत व्यक्त केली आहे.