

OMKAR KARVE
ESAKAL
मालिकांमधील कलाकारांचे निर्मात्यांसोबत किंवा दिग्दर्शकासोबत वाद झालेले आपण ऐकतो. त्यामुळे काही कलाकार तडकाफडकी मालिका सोडण्याचा निर्णय घेतात. मात्र त्यामुळे कधीकधी ते चुकीचे नसूनही त्याची फार मोठी किंमत त्यांना भोगावी लागते. त्यांना इंडस्ट्रीमधून काम मिळणं बंद होतं. इंडस्ट्रीतील लोक मिळून त्या कलाकाराविरोधात कारस्थान करतात. असाच काहीसं घडलं लोकप्रिय मराठी अभिनेता ओंकार कर्वे याच्यासोबत. सेटवर होणाऱ्या चुकीच्या गोष्टीबद्दल जाब विचारण्याची त्याला मोठी शिक्षा देण्यात आली.