

pankaj vishnu
esakal
'चार दिवस सासूचे' या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले अभिनेते पंकज विष्णू आजही प्रेक्षकांचे आवडते आहेत. त्यांनी 'चार दिवस सासूचे' मालिकेत रवीची म्हणजेच अनुराधाच्या पतीची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा हिंदी सिनेमांकडे वळवला. त्यांनी 'पवित्र रिश्ता'मध्येही काम केलं. सध्याही ते हिंदी मालिकेतच काम करताना दिसतायत. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीमधील मानधनाचा फरक सांगितला आहे. हिंदी इंडस्ट्रीमध्ये मुख्य अभिनेत्याला किती पैसे मिळतात हे त्यांनी सांगितलंय.