
'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सुरज चव्हाण याचा ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. त्यानंतर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून लाइव्ह सेशन घेत चित्रोताच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणालेले, 'कदाचित माझ्यात, माझ्या विचारांत काहीतरी खोट असेल, त्यामुळे सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही. त्यांना तो (सूरज चव्हाण) अभिनेता बघायचाच नसेल. त्यामुळे त्यांनी ती गोष्ट नाकारली. आता दिग्गज अभिनेते विजय चव्हाण याचा मुलगा वरद चव्हाण याने युट्युबवर एक व्हिडिओ शेअर करत त्याची बाजू मांडली आहे.