
'लाखात एक आमचा दादा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता स्वप्नील पवार गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चेत होता. त्याच्या आईच्या उपचारासाठी त्याने सोशल मीडियावर मदत मागितली होती. त्याची आई गेल्या ३ महिन्यांपासून इस्पितळात दाखल होती. मात्र अखेर त्याची आई घरी परत आलीये. त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांचे स्वप्नीलने आभार मानलेत. त्याने वाढदिवसाला आपल्याला सगळ्यात भारी गिफ्ट मिळालंय असं म्हटलंय.