
अभिनय क्षेत्र हे बाहेरून अतिशय झगमगाटाचं दिसत असलं तरी त्याच्या आतलं चित्र अत्यंत विदारक आहे. आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त असं चित्र आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत कलाकार जास्त आणि मालिका आणि चित्रपट कमी असं चित्र आहे. त्यामुळे अनेक कलाकारांना काम मिळत नाहीये. कित्येक हिंदी आणि मराठी अभिनेते कामावाचून घरी बसलेत. मात्र त्यामुळेच कलाकार नैराश्यात गेलेले दिसतात. अशाच परिस्थितीचा सामना करताना एका अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसलाय. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक तुषार घाडीगांवकरचे निधन झाले आहे.