sushant shelar

sushant shelar

esakal

दुबईत रंगणार मराठी कलाकारांची क्रिकेट लीग; सुशांत शेलारच्या एस एस सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीगची चर्चा

Marathi Celebrities to Play Cricket League in Dubai: एसएससीबीसीएल(SSCBCL) मध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील कलाकारांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे.
Published on

कलाकार आणि क्रिकेट यांचं एक खास नातं आहे हे वारंवार दिसून आलं आहे. कधी क्रिकेटपटू मैदान सोडून अभिनय क्षेत्रात तर कधी कलाकार क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. क्रिकेट म्हटलं की, सगळ्यांमध्ये उत्साह संचारतो. मग आपले मराठी सिनेसृष्टीतील कलाकार कसे मागे राहतील. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार क्रिकेटचे शौकीन आहेत. पण शुटिंग, वेळेची कमतरता यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी वेळ मिळत नाही हेच कारण लक्षात घेऊन अभिनेता सुशांत शेलार यांनी ‘एस एस सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ चे (SSCBCL) आयोजन यंदा थेट दुबईत केले आहे. ज्योती एन्टरटेन्मेन्टचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com