

ANUSHKA SARKATE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर एंट्री करताना दिसतात. आपणही चित्रपटात दिसावं असं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. त्यासाठी कलाकार दिवसरात्र झटत असतात. आता स्टे प्रवाहच्या अभिनेत्रीला लॉटरी लागली आहे असं म्हणावं लागेल. नुकतीच तिची नवीन मालिका सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसात तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालीये. यात ती आधीच्या मालिकेतील अभिनेत्यासोबत दिसणार आहे.