
छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अनेक चेहरे घराघरात लोकप्रिय होतात. असाच एक चेहरा सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. तो म्हणजे 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील वसुंधरा. या मालिकेतील आकाश आणि वसुंधरा यांची जोडी प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. अनेक संकटांवर मत करत वसुंधरा आपला संसार टिकवण्याचा प्रयत्न करतेय. मालिकेत वसुंधराची भूमिका साकारतेय अभिनेत्री अक्षया हिंदळकर. मात्र या मालिकेत एंट्री करण्यापूर्वी अक्षयाचा मोठा अपघात झाला होता. तब्बल दीड वर्ष ती चालू शकत नव्हती.