दुसऱ्या लग्नानंतर तीन महिन्यांनी मराठी अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; घरी आली नवी पाहुणी; चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

MARATHI ACTRESS GAVE GOOD NEWS TO FANS: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलेलं. आता लग्नानंतर तीन महिन्यांनी अभिनेत्रीने चाहत्यांना गुड न्यूज शेअर केलीये.
shubhangi sadavarte

shubhangi sadavarte

ESAKAL 

Updated on

गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. यात 'संगीत देव बाभळी' फेम अभिनेत्री शुभांगी सदावर्तेही आहे. शुभांगीने तीन महिन्यांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. घटस्फोटाच्या काही महिन्यातच तिने दुसरं लग्न केलेलं. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला. आता लग्नानंतर तीन महिन्यात शुभांगीने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. तिच्या घरी एक नवी पाहुणी आलीये. शुभांगीने तिच्या पतीला नवीन कार गिफ्ट केली आहे. तिने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात ती नवीन गाडी घेताना दिसतेय. तिचा आनंद ओसंडून वाहत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com