आपल्याच आईचं बालपण साकारणार खरीखुरी लेक; 'द्विधा' मध्ये रिअल लाइफ मुलीसोबत दिसणार लोकप्रिय अभिनेत्री

MANASI KULKARNI DWIDHA MOVIE UPDATE: 'द्विधा' हा केवळ बाप-लेकीच्या नात्यावर आधारित चित्रपट नसून, प्रत्येक नात्यातील प्रेम,विश्वास आणि भावभावनांचा हळवा प्रवास संवेदनशीलतेने मांडणारा चित्रपट आहे.
manasi kulkarni with daughter

manasi kulkarni with daughter

ESAKAL

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीत कलाकारांच्या पुढच्या पिढीबद्दल प्रेक्षकांना नेहमीच विशेष आकर्षण असते. अशाच एका खास योगायोगामुळे आगामी मराठी चित्रपट 'द्विधा' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी साकारलेल्या 'श्रावणी' या मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या बालपणीच्या भूमिकेत तिची कन्या ओवी दिसणार आहे. ‘द्विधा' चित्रपटाच्या निमित्ताने ही मायलेकीची जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, ओवीचा मोठ्या पडद्यावरचा हा पहिलाच ‘ऑनस्क्रीन’ प्रयत्न असूनही तिने आत्मविश्वास, आणि निरागसतेने ही भूमिका साकारत सर्वांची दाद मिळवली आहे. येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com