

niyati rajwade
ESAKAL
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करत असतात. गेल्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीत घटस्फोटाबद्दल मोकळेपणाने बोललं जातंय. याचा प्रत्येकाच्या आयुष्यावर वेगळा परिणाम होतो. अनेक अभिनेत्रीही आता मोकळेपणाने त्यांच्या आयुष्याबद्दल आणि कठीण काळाबद्दल बोलताना दिसतात. अशाच एका मराठी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलंय. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या वादळाने ती खचून नाही गेली. तिने पुन्हा उभारी घेत स्वतःला सिद्ध केलं आणि अभिनय क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवलं. ही अभिनेत्री म्हणजे नियती राजवाडे.