

MARATHI ACTRESS LEFT TMKOC
ESAKAL
'तारक मेहता का उल्टा चश्मा' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सर्वाधिक गाजणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. मात्र जितकी या मालिकेच्या यशाची चर्चा होतेय तितकीच मालिकेच्या कलाकारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीचीही चर्चा होते. गेल्या वर्षभरात याच मालिकेतील काही कलाकारांनी मालिकेच्या सेटवर आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सांगितलं होतं. मालिकेची टीम अगदी निर्मातेदेखील असभ्य शब्द वापरत असल्याचं या कलाकारांनी म्हटलं होतं. आता या मालिकेत काम करणाऱ्या मराठी अभिनेत्रीलादेखील असाच अनुभव आलाय. मात्र तिने मालिका सापडल्यानंतरही तिच्यावर दबाव आणला जातोय.