

nandini vaidya
ESAKAL
गेल्या काही वर्षात छोट्या पडद्यावर अनेक मालिका अशा आल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. छोट्या पडद्यावर नेक मालिका प्रदर्शित होत असतात मात्र त्यातील फार कमी मालिका असतात ज्या वर्षानुवर्षे आपला प्रेक्षक टिकवून ठेवतात. अशाच गाजलेल्या मालिकांमधलीच एक म्हणजे 'पुढचं पाऊल' ही सिरीयल. या मालिकेने तब्बल ६ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. स्टार प्रवाहावरील या मालिकेत कल्याणी, आक्कासाहेब ऊर्फ राजलक्ष्मी, रूपाली, कांचनमाला, पिंटू मामा, सोहम सरदेशमुख, रोहित सरदेशमुख अशी पात्र होती. तर अभिनेत्री जुई गडकरी आणि हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत होते. ही मालिका तेव्हा आणखी एका अभिनेत्रीला ऑफर झाली होती. मात्र त्या अभिनेत्रीने मालिकेला नकार दिलेला. कोण आहे ती अभिनेत्री?