

komal kumbhar lovestory
ESAKAL
प्रत्येकाची प्रेमकहाणी वेगळी असते. कुणाची सोपी असते, तर कुणाची कठीण असते. मात्र असं असलं तरी प्रेम हे प्रेम असतं. अशीच हटके प्रेम कहाणी आहे अभिनेत्री कोमल कुंभार हिची. कोमल 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यात ती अंजीच्या भूमिकेत होती. तिने नुकतंच गोकुळ दशवंत याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र त्यांच्या प्रेमाला अभिनेत्रीच्या घरातल्यांचा विरोध होता. तिच्या करिअरला देखील तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. मात्र तिने संघर्ष करत आज यशाचा टप्पा गाठलाय. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कोमलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलंय.