

ruchita mane
esakal
भारतीय परंपरेत स्त्री- पुरुष कायम आपल्या नावामागे वडिलांचं नाव लावतात. तर लग्न झाल्यानंतर स्त्रियांचं सासरचं नाव बदलण्यात येतं. सासरी गेल्यावर तिच्या माहेरचं नाव बदलून पतीचं नाव तिच्या नावापुढे जोडण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षात अनेक पुरुष आपल्या नावापुढे आईचं नावदेखील लावतात. तर स्त्रिया लग्नानंतरही आपलं माहेरचं नावच कायम ठेवतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय असतो. मात्र आता एका मराठी अभिनेत्रीने लग्नाच्या ७ वर्षानंतर तिच्या नावात बदल केला आहे. तिने पोस्ट करत त्यामागचं कारणही सांगितलं आहे.