
छोट्या पडद्यावरील काही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. तर काही मालिकांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात. अशीच छोट्या पडद्यावर एक मालिका चांगलीच गाजतेय ती म्हणजे 'लक्ष्मी निवास'. यात अनेक मोठे कलाकार दाखवण्यात आले आहेत. ही मालिका दररोज १ तास प्रसारित होते. त्यामुळे प्रेक्षकही या मालिकेची आवर्जून वाट पाहत असतात. या मालिकेतील भावना, सिद्धू, लक्ष्मी, श्रीनिवास, जान्हवी, वेंकी, वीणा ही सगळीच पात्र आता घराघरात लोकप्रिय झालीयेत. मात्र आता मालिकेत अशा काही गोष्टी दाखवल्या जातायत ज्यामुळे मालिकेवरच प्रेक्षकांचा रोष वाढताना दिसतोय. आता एका अभिनेत्रीने या कथानकावरून झी मराठीलाच प्रश्न विचारलाय.