
मराठी सिनेसृष्टीत काम मिळवणं हे अवघड आहे. तुमच्या ओळखीने तुम्हाला कधीतरी काम मिळतं. पण तिथे टिकून राहणं फार अवघड. आजही असे अनेक मराठी कलाकार आहेत जे चांगले अभिनेते असूनही, त्यांना कलेची जाण असूनही, अनुभव असूनही कामाशिवाय घरी बसलेले आहेत. मात्र काही जणांना निव्वळ फॉलोवर्स जास्त आहेत म्हणून मालिका आणि सिनेमांमध्ये कास्ट केलं जातं. फक्त कास्टच नाही तर त्यांचं कर्तृत्व शून्य असतानाही त्यांना पुरस्कार दिले जातात. अशा व्यक्तींविषयी लोकप्रिय अभिनेत्रीने एक खोचक पोस्ट केलीये. मात्र ही पोस्ट खासकरून रीलस्टार सुरज चव्हाण याच्यासाठी असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.